Suhas Gokhale

About Our Course

Who is this Course For?

ज्योतिषशास्त्र – प्राथमिक स्तर

ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्राची काहीही माहीती नाही अशी व्यक्ती डोळ्या समोर ठेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गाला वयाची, शिक्षणाची, जाती-धर्माची अट नाही, ज्योतिषशास्त्रा बद्दल काही माहीती असणे आवश्यक नाही. अभ्यासक्रम पूर्णत: मराठी भाषेत शिकवला जाणार असल्याने इंग्रजी भाषेची कोणतीही अडचण येणार नाही. गणिताचा भाग केवळ बेरीज- वजाबाकी-गुणाकार – भागाकार इतकाच मर्यादीत ठेवलेला असल्याने गणीताचा बाऊ करण्याचीआवश्यकता नाही. आपली शिकण्याची तळमळ आणि मेहनत करण्याची तयारी इतकेच काय ते अपेक्षित आहे.

धार्मिकता , श्रद्धा आणि आध्यात्म या पासुन संपूर्णपणे अलिप्त असलेला हा अभ्यासक्रम अगदी कट्टर नास्तिक व्यक्तीला किंवा मुस्लीम /ख्रिश्चन अशा इतर धर्माच्या विद्यार्थ्याला देखील त्याच्या धर्माची / श्रद्धेची कोणतीही आडकाठी न येता सहज पूर्ण करता येईल.

या अभ्यासक्रमात ज्योतिषशास्त्राची ओळख करुन दिली जाईल, ज्योतिषशास्त्र नेमके आहे तरी काय, त्याच्या मर्यादा काय हे समजाऊन सांगीतले जाईल, या शास्त्राचा नेमका आणि खरा उपयोग काय आहे आणि तो कसा करुन घ्यायचा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. ज्योतिषशास्त्राच्या सर्व मुलभुत संकल्पना, ज्योतिषाशास्त्राचे सर्व मुख्य आधारस्तंभ ,महत्वाचे नियम- आडाखे सखोल पणे शिकवले जातील तसेच अचूक भविष्यकथनासाठी प्रसिद्ध असलेली ‘कृष्णमुर्ती पद्धती’ पण विस्ताराने शिकवली जाईल. ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्र,जातक कसे हाताळावे, व्यावसायीक शिस्त कशी जोपासायची,अभ्यास कसा वाढवायचा , व्यासंग कसा करायचा या बद्दल अत्यंत बहुमोल माहीती या अभ्यासक्रमात सांगीतली जाईल.

अनावश्यक फाफटपसारा , गणिताचे अवडंबर , भाकड नियमांच्या भूलभुलैयाला काट मारुन, शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून , निखळ गणित, शुद्ध तर्कशास्त्र आणि केवळ काळाच्या कसोटीवर टिकलेल्या / सिद्ध झालेल्याच नियम आणि संकल्पनांवर आधारीत असा हा अभ्यासवर्ग आपला ज्योतिषशास्त्रातला पाया भक्कम करुन देऊन आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण करेल.

Get notified when the course launches.